Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचं लवकरच होणार वेतन

शनिवारी किंवा सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा मिळेल

एसटी कर्मचाऱ्यांचं लवकरच होणार वेतन
SHARES

कोरोनामुळं राज्यात इतर वाहतुक बंद असून, केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहतुक सुरू ठेवण्यात आली आहे. यामध्ये एसटी बसही कर्मचाऱ्यांना सेवा देत आहे. परंतु, जीव धोक्यात घालून सेवा पुरवत असतानाही वेळेवर वेतन न झाल्यानं एसटीच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांचं एप्रिल महिन्यातील वेतन ७ तारखेला झाले नाही. परंतु, बुधवारी राज्य सरकारकडून सवलतीमधील शिल्लक ३०० कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळं पुढील शनिवारी किंवा सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा मिळेल, अशी माहिती समोर येत आहे.

दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन होतं. एप्रिल महिन्यात वेतन झालेच नाही. मात्र अधिकारी वर्गाचं वेतन झालं. त्यामुळं कर्मचारी वर्गाला डावलल्याचं मत कर्मचाऱ्यांमध्ये होत होतं. एसटी कामगार संघंटनांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना निवेदनं पाठवून वेतन देण्याची मागणी केली आहे. वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. परंतु, राज्य सरकारकडं सवलतीचे शिल्लक असलेले ३०० कोटी रूपये मिळणार आहेत.

हे पैसे मिळाल्यावर एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं गुरुवारी वेतन होणार नाही. शुक्रवारी गुड फ्रायडेची सार्वजनिक सुट्टी आणि शनिवार सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस काम असल्यानं बँकांवर अधिकचा कामाचा ताण पडू शकतो. त्यानंतर रविवारी सुट्टी आहे. शनिवारी बँकेतील काम झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शनिवारी होण्याची शक्या आहे.



हेही वाचा -

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप

जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा