Advertisement

टीव्ही चॅनलच्या किंमतीत वाढ

नव्या नियमांच्या अंमलबजावणीनं ग्राहकांचे टीव्ही पाहणे स्वस्त होणार असल्याचं ट्रायचं म्हणणं होतं. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या चॅनल्सचे दर अधिक असल्यानं ग्राहकांचा ४० ते ६० टक्के खर्च मनोरंजनावर होऊ लागला आहे.

टीव्ही चॅनलच्या किंमतीत वाढ
SHARES

आता आपल्या आवडीनुसार टीव्ही चॅनल निवडता येणार असले, तरी त्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नुकताच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने केबल ऑपरेटिंगच्या धोरणात बदल केले आहेत. १ फेब्रुवारीपासून हे बदल अंमलात आणले गेले. मात्र ट्रायनं केलेल्या बदलाचा फायदा ग्राहकांना न होता वाहिन्या आणि डीटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे चॅनेल निवडिचे स्वातंत्र्य देत असल्याचा ट्रायचा दावा फोल ठरला आहे. ट्रायच्या या निर्णयाबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


ग्राहकांच्या खिशाला भूर्दंड

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)नं सर्व मल्टी-सर्व्हिस ऑपरेटर (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्स (LCOs)ला 29 डिसेंबपासून नवीन टॅरिफ पद्धत सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विशिष्ट कोणते टीव्ही चॅनल पाहण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही. ग्राहकांना आता त्यांच्या आवडीनुसार चॅनल पाहण्याचे स्वातंत्र दिले आहे. मात्र ज्या चॅनलचे पैसे र्गाहकांना दिलेले असतील तेवढेच टीव्ही चॅनल पाहता येणार आहेत. तसंच सर्व चॅनल्स वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत. मात्र या किंमती ग्राहकांच्या खिशाला न परवडणाऱ्या आहेत. पूर्वी एखाद्या कुटुंबाच्या आवडीचे चॅनेल डीटीएच कंपन्या साधारणपणे 200 रुपयांमध्ये देत असत. ट्रायनं घेतलेल्या या निर्णयामुळे आता याच कुटूंबाला चॅनेल निवडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय पूर्वीचे चॅनेल घेण्यासाठी किमान 450 ते 500 रुपयेहून अधिक द्यावे लागत असल्यानं सामान्यांना आता चांगलाच भूर्दंड सोसावा लागत आहे.


किंमती कमी होण्याऐवजी वाढल्या

सध्या भारतात ८३४ चॅनलची संख्या असून त्यामध्ये ३३५ चॅनल्ससाठी पैसे मोजावे लागतात. उर्वरित फ्री टू एअर आहेत. मात्र, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियानं (ट्राय) १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना चॅनल निवडीचे स्वातंत्र्य प्रदान केलं. नव्या नियमांच्या अंमलबजावणीनं ग्राहकांचे टीव्ही पाहणे स्वस्त होणार असल्याचं ट्रायचं म्हणणं होतं. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या चॅनल्सचे दर अधिक असल्यानं ग्राहकांचा ४० ते ६० टक्के खर्च मनोरंजनावर होऊ लागला आहे



हेही वाचा

ट्रायची नवी नियमावली लागू, ग्राहक मात्र अजूनही संभ्रमात


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा