Advertisement

अंधेरी स्थानकात बांधणार २ नवीन पूल

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासठी पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) स्वतंत्रपणे २ पादचारी पूल बांधण्याचं ठरवलं आहे. यापैकी एक पूल पूर्व आणि पश्चिमेस जोडणारा असेल, तर दुसरा पूल प्लॅटफॉर्म अंतर्गत दक्षिण-उत्तरेस जोडणारा असेल.

अंधेरी स्थानकात बांधणार २ नवीन पूल
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकातील ८ आणि ९ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर एकच पादचारी पूल असल्याने या पादचारी पूलावर मोठी गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासठी पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) स्वतंत्रपणे २ पादचारी पूल बांधण्याचं ठरवलं आहे. यापैकी एक पूल पूर्व आणि पश्चिमेस जोडणारा असेल, तर दुसरा पूल प्लॅटफॉर्म अंतर्गत दक्षिण-उत्तरेस जोडणारा असेल. हे पूल बांधून झाल्यास प्रवाशांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.


पूल बांधण्याचं काम सुरू

अंधेरी स्थानकातील ८ आणि ९ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून पूर्व आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या पुलाचं काम पश्चिम रेल्वेने हाती घेतलं आहे. हा पूल स्कायवॉकशी जोडला जाणार असल्याने प्रवाशांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. तसंच, 'एमआरव्हीसी'ने प्लॅटफॉर्मवरील अंतर्गत पूल जोडण्याचं काम हाती घेतलं आहे. प्लॅटफॉर्मवरील दक्षिण आणि उत्तरेकडील भाग जोडल्यानंतर पूर्वेकडील भागही जोडण्यात येणार आहे.


पुढील वर्षापासून सुरू

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात दररोज मोठी गर्दी होत असते. या स्थानकातील ८ आणि ९ स्थानकांत मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी थांबे देण्यात आले आहेत. परंतु या प्लॅटफॉर्मवर एकच पादचारी पूल असल्यामुळं पुलावरून चालताना प्रवाशांची रेटारेटी होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे आणि महामंडळाने नवीन २ पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पूल पुढील वर्षापर्यंत सुरू होणार आहेत.



हेही वाचा-

ट्रॅकमन, गँगमनच्या सुरक्षेसाठी 'रक्षक'

'महालक्ष्मी जत्रे'साठी बेस्टच्या जादा बस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा