अंधेरीतील (andheri) पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या (gokhale bridge) दक्षिणेकडील बाजूचे काम अपूर्ण राहीले आहे. तसेच या पुलाचा गर्डर खाली उतरवण्यास विलंब झाल्यामुळे पूल पूर्ण होण्याच्या कामाला अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
आतापर्यंत 7.5 मीटर पैकी फक्त 1.25 मीटरचे काम झाले आहे. ज्यामुळे एप्रिल 2025 पर्यंत काम पुर्ण होण्याच्या अंतिम मुदतीबाबत शंका निर्माण झाली आहे.
दुसऱ्या गर्डरचा 86 मीटरचा विस्तार सप्टेंबर 2024 मध्ये करण्यास सुरुवात झाली. तथापि, विलंबामुळे पुढील कामे ठप्प झाली आहेत.
तसेच एका पालिका अधिकाऱ्याने नमूद केले आहे की, विलंब होत असताना, महापालिका उर्वरित कामांना गती देण्यासाठी वचनबद्ध आहे.
अंधेरी लोखंडवाला ओशिवरा (oshiwara) सिटिझन असोसिएशनचे संचालक धवल शाह यांनी या पुलाच्या कामाबाबत झालेल्या दिरंगाईवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “पावसाळ्याच्या केवळ पाच महिन्यांपूर्वी प्रकल्पाचे इतकेच काम पूर्ण होणे हे चिंताजनक आहे. सध्याच्या सुरू असलेला कामाचा वेग पाहता मे 2025 पूर्वी काम पूर्ण होणे अशक्य आहे.
पश्चिम रेल्वेच्या (western railway) समन्वयाने Rights Limited द्वारे व्यवस्थापित, 1,300-मेट्रिक-टन गर्डरची स्थापना तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ऑपरेशन आहे. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यावर डांबरीकरण, स्ट्रीट लाईट आणि रस्त्याच्या खुणा यांसारखी अतिरिक्त कामे केली जातील.
फेब्रुवारी 2024 मध्ये अंशतः पुन्हा उघडण्यात आलेला हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम दरम्यानची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक आहे. महापालिका (bmc) 30 एप्रिलची अंतिम मुदत (deadline) पूर्ण करेल असे सांगत आहे.
असे असताना अंतर्गत सूत्रांनी असे सुचवले आहे की, विलंबामुळे मे 2025 पर्यंत काम पूर्ण होऊ शकते.
हेही वाचा