पश्चिम रेल्वे (Western Railway) लवकरच एक अंतर्गत मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन लाँच करणार आहे. लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यासाठी या वेब अॅप्लिकेशनचा वापर करण्यात येईल. तसेच कोणताही बिघाड झाल्यास लगेचच सूचित करेल. चर्चगेट (churchgate) ते डहाणू (Dahanu) मार्गावरील सर्व 122 स्वयंचलित जिने आणि 69 लिफ्टवर या अॅप्लिकेशन द्वारे लक्ष ठेवले जाईल.
प्रवास सुलभ करण्यासाठी स्वयंचलित जिने आणि लिफ्ट बसवण्यात आल्या होत्या, परंतु उपकरणांमध्ये बिघाड झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील अहवालानुसार, पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) प्रत्येक स्वयंचलित जिना दिवसातून पाच वेळा बंद पडतो. हे ॲप त्यांचा डाउनटाइम कमी करण्यात मदत करेल. याचा अर्थ लिफ्ट आणि स्वयंचलित जिने चालविण्यासाठी कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागेल.
रेल्वे अधिका-यांनी दावा केला आहे की, प्रवासी बऱ्याचदा स्वत:हून आपत्कालीन स्टॉप बटण सक्रिय करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्थानकांवर हे अधिक प्रमाणात होते. चोरांद्वारे देखील स्टॉप बटण दाबले जाते, ज्यामुळे स्वयंचलित जिना कर्मचाऱ्यांनी दुरुस्त करेपर्यंत बंद राहतो.
प्रत्येक लिफ्ट किंवा स्वयंचलित जिन्याच्या देखभालीसाठी कर्मचारी नेमणे किफायतशीर नाही. यासाठी, लिफ्ट आणि एस्केलेटरसाठी वेब-आधारित जीएसएम अलार्म मॉनिटरिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशनशी जोडले जाईल. आणि लिफ्ट किंवा स्वयंचलित जिन्याची देखभाल ठेवली जाईल.
हेही वाचा