गोरेगाव - गोरेगाव पूर्व परिसराती आरे कॉलनी मध्ये असलेल्या बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
आरे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी अनेक वर्षांपूर्वी येथे बस थांबा बांधला होता. मात्र आता हा थांबा मोडकळीस आला आहे. त्याचे खांब मोडले असून, वरचे छपर तुडून त्यावर गवत वाढले आहे. हा बस स्टॉप आरे ने 50 वर्षांपूर्वी बांधला होता. त्यावेळी बांधकामासाठी सागाचे लाकूड वापरल्यामुळे बस थांब्याचे खांब अजून पूर्णपणे मोडलेले नाहीत. पण मुसळधार पावसात हे खांब तुटून पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत आरेचे सीईओ गजानन राऊत यांच्याकडे विचारणा केली असता "आरेचा तो रस्ता पालिका व बेस्टला देण्यात आला आहे. त्यामुळे त्या खांबाची देखरेख त्यांनीच करावी, असे सांगितले.