Advertisement

भारत मॅच हरला, पण खेळाडूंनी ‘अशी’ जिंकली सर्वांची मनं

अशाच ५ मॅचमधील उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिथे आपल्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली.

भारत मॅच हरला, पण खेळाडूंनी ‘अशी’ जिंकली सर्वांची मनं
SHARES

२४ ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पुरुषांच्या T20 विश्वचषक २०२१ च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तान विरुद्ध खेळला. इतिहासात पाहिलं तर कळतं की भारत पाकिस्तानविरुद्ध कधीही हरला नाही. पण रविवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली आणि मॅच जिंकली.

हा सामना भारत पाकिस्तानविरुद्ध हरला असला तरी, मॅन इन ब्लूनं सर्वांची मनं जिंकली. अशाच ५ मॅचमधील उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिथे आपल्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली.

१) एमएस धोनी, विराट कोहली पाकिस्तानी खेळाडूंशी साधला संवाद

२४ ऑक्टोबर, भारतानं पाकिस्तानला दहा गडी राखून पराभूत केल्यानंतर विराट कोहली आणि एमएस धोनी यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी संवाद साधला. एमएस धोनी शोएब मलिकशी बोलताना दिसला तर विराट रिझवानशी बोलताना दिसला.


२) विराट कोहली मोहम्मद आमीरला त्याची बॅट भेट देतो तेव्हा

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान विराट कोहलीनं मोहम्मद अमीरला त्याची बॅट भेट दिली होती. एवढंच नाही तर त्याचावर बंदी घातल्यानंतर क्रिकेटमध्ये लक्षणीय पुनरागमन केल्याबद्दल मोहम्मद अमीरचं विराटनं कौतुक केलं होतं.

३) एमएस धोनीचा सरफराज अहमदच्या मुलासोबतचा फोटो व्हायरल

२०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या आधी, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीनं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदच्या मुलाला हातात घेऊन फोटो काढला होता. पाकिस्तानमधील बऱ्याच लोकांनी हा फोटो पुन्हा पोस्ट केला आणि त्याच्या हावभावाची प्रशंसा केली होती.

 ४) युझवेंद्र चहल उस्मान खानच्या बुटाची फेस बांधत आहे

२०१८ आशिया कप दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान खान फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याच्या बुटाची लेस उघडी होती. त्यानं हातमोजे घातले होते म्हणून त्याला लेस बांधता येत नव्हती. पण चहल त्याच्या मदतीला धावून आला आणि त्यानं त्याच्या बुटाची लेस बांधली.

५) शोएब अख्तरला उठायला मदत करताना वीरेंद्र सेहवाग

२००७-०८ मध्ये एकदिवसीय मालिकेत शोएब अख्तर जमिनीवर कोसळला. तेव्हा त्याची मदत सेहवागनं केली होती. त्याला उठण्यासाठी सेहवागनं हात पुढे केला होता.

कालच्या सामन्यानंतर व्हायरल झालेलं आणखी एक उदाहरण म्हणजे कर्णधार विराट कोहली मोहम्मद रिझवानला मिठी मारताना दिसला. शिराज हसन या पाकिस्तानी पत्रकारानं आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

 

आपल्या खेळाडूंची हीच वृत्ती तर सर्वांची मन जिंकते. 




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा