चेंबूर - लग्नाचं आमिष दाखवत चेंबूरच्या तुर्भे परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलीवर याच परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांमध्ये मैत्री होती. त्यानंतर मुलानं मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा आत्याचार केला होता. ही बाब मुलीच्या आईला समजताच तिनं ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठत मुलाविरोधात शनिवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत या मुलाला बेड्या ठोकल्या.