माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईत (mumbai) या वर्षात राजकीय हत्या किंवा गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खानच्या (salman khan) घरावर हल्ला, घोपदेव येथील राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हत्या या प्रकरणांचाही समावेश आहे.
मुंबईत गेल्या 9 वर्षात गोळीबाराच्या (firing) 19 घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
नुकतेच 5 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे भायखळा विधानसभा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी उर्फ मुन्ना (45) यांची घोपदेव परिसरात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
या वर्षातील सर्वात चर्चेत असलेली घटना म्हणजे सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना. 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानला त्याच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्या प्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विक्की गुप्ता आणि सागर श्री जोगेंद्र पाल या शूटर्सला गुजरातमधून अटक करण्यात आली होती.
याशिवाय 7 एप्रिल रोजी आर्थिक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत विजय शेट्टीयार नावाच्या आरोपीने अँटॉप हिल परिसरात आकाश कदम यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर शेट्टीयारला डोंबिवलीतून अटक करण्यात आली होती.
याशिवाय 2 फेब्रुवारी रोजी बोरिवली (borivali) परिसरात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद सुरू होता. मात्र नुकतेच दोघांनीही एकमेकांविरुद्धचे वाद मिटवला.
त्यामुळे मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यालयात बोलावले. त्यावेळी मॉरिसने केबिनमध्ये जाऊन थेट गोळीबार केला. मॉरिसने त्याच्या रिव्हॉल्वरमधून घोसाळकर यांना गोळी झाडली. यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळी झाडली.
हेही वाचा