नवी मुंबईतील (navi mumbai) उरणमध्ये (uran) एका 22 वर्षीय तरुणीची हत्या (murder) करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा रेल्वे स्थानकाजवळील झुडपात तिचा मृतदेह आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आपल्या कुटुंबासह उरण इथे राहत होती. ती बेलापूर येथील एका कंपनीत कामाला होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "महिला गुरुवारी सकाळी ऑफिससाठी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती."
कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला आणि अखेर त्यांनी गुरुवारी उरण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी सांगितले की त्यांना शनिवारी पहाटे 2 वाजता रेल्वे स्टेशनजवळील झुडपात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी एक पथक पाठवण्यात आले आणि त्यानंतर अवशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरण पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “महिलेची ओळख तिच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये पटवली आणि त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत तरुणीच्या वडीलांनी सांगितले की, दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने त्यांच्या मुलीची हत्या केली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “शरीराचे तुकडे केलेले नाहीत, परंतु तिच्या पोटावर आणि पाठीवर अनेक जखमा आढळल्या आहेत. आम्ही हत्येचा (murder) गुन्हा दाखल केला आहे. जर वैद्यकीय अहवालात असे आढळून आले की, खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला तर आम्ही एफआयआरमध्ये (FIR) तसे कलम जोडू. संशयिताचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली असून तपास चालू असल्याचे उरण पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान, कामावर गेलेल्या तरुणीने अर्धा दिवसच काम केल्याचे पोलिसांना समजले. “आम्हाला संशय आहे की हत्येची घटना गुरुवारी दुपारी 3.30 किंवा 4 च्या सुमारास घडली असावी. तसेच वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत,” असे पोलिस अधिकारी पानसरे म्हणाले.
हेही वाचा