मुंबईत कुठलीही दुर्घटना घडली की,
सर्व सामान्य मदतीसाठी पहिला फोन अग्निशमन दलाला लावला जातो. मुंबईच्या अग्निशमन दलाच्या विभागात अद्यायावत सुविधांची कमी नाही.
मात्र दिवसेंदिवस मनुष्यबळाची कमतरता आता अग्निशमन दलात जाणवू लागली आहे.
मुंबईच्या अग्निशमन दलात सध्या ३८०८ पदे मंजूर आहेत.
परंतु,
त्यातील २ हजार ८८० पदे भरली असून ९२७ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.
भारताची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईला सर्वाधिक सुरक्षित शहर मानले जातं. परंतु, गेल्या साडेपाच वर्षांत मुंबईत तब्बल ४९ हजार १७९ आपत्कालिन दुर्घटना घडल्या. यामध्ये ९८७ लोकांचा बळी गेला, तर ३ हजार ६६ जण जखमी झाले आहेत. मुंबईत कोणतिही दुर्घटना घडली की, महापालिकेने स्वतंत्र्य व्यवस्था केलेल्या आपत्कालिन पथक मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी धावून जातं.
सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने तक्रारींचा पाऊसच मुंबईच्या अग्निशमनदलाकडे दिवस-रात्र पडत आहे. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य ओळखून महापालिकेने अग्निशमन दलासाठी २८०८ पदे मंजूर केली होती. प्रत्यक्षात त्यापैकी २८८० पदेच भरण्यात आली आहे. अद्यापही अग्निशमन दलाची ९२७ पदे ही रिक्त असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी मागवलेल्या माहितीतून पुढे आली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा-
प्लास्टिक पिशवीतील दूध लवकरच हद्दपार?