रेल्वे परिसरात पंतगबाजीला कराल, तर होईल कारवाई

रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार व्होलटेजने विद्युत प्रवाह सुरू असतो. अनेकदा पंतगीचा मांजा ओव्हर हेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे शाँक लागून तरुणांचा मृत्यू पडल्याच्या ही घटना घडल्या आहेत.

रेल्वे परिसरात पंतगबाजीला कराल, तर होईल कारवाई
SHARES

मकरसंक्रांतीचा सण जवळ येऊ लागतो तसतसे पतंग उडवण्याचा ज्वर टिपेला पोहोचत जातो. मात्र आता रेल्वे परिसरात पंतग उडवणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्यात आदेश दिले आहेत. कारण पंतगीच्या मांडा ओव्हरवायर वायरवर पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळपत्रकावर ही होता. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने परिसरात पंतग उडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

मकरसंक्रांत आणि पतंग हे समीकरण असून या कालावधीत अनेक जण हौसेने पतंग उडवतात. प्रतिस्पध्र्याचा पतंग कापण्यासाठी धारदार मांज्यांना तरुणांची पसंती असते. त्यामुळे बाजारात धातूमिश्रित तसेच काचमिश्रित मांज्यांची मोठी चलती आहे. मात्र, या मांज्यांवर रसायनाचा थर चढवण्यात येत असल्याने उघडय़ा वीजवाहिन्यांशी त्यांचा संपर्क येताच मांज्यातून वीज प्रवाहित होऊन पतंग उडवणाऱ्याला विजेचा धक्का बसतो. मुंबईत होणाऱ्या मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होत असून त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागतो. पतंगबाजीचा मांजा रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये अडकून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे लोकलसेवा ठप्प होऊन त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळपत्रकावर होतो.

हेही वाचा- टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार, आरपीएफ जवानाला अटक

रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार व्होलटेजने विद्युत प्रवाह सुरू असतो.  अनेकदा पंतगीचा मांजा ओव्हर हेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे शाँक लागून तरुणांचा मृत्यू पडल्याच्या ही घटना घडल्या आहेत. तर अनेक तरुण पतंग पकडण्यासाठी रेल्वे रुळावर धावतात. त्यावेळी रेल्वेची धडक बसून त्यांचा अपघाती मृत्यू होता. या सारख्या घटना रोखण्यासाठी रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे परिसरात पतंग न उडवण्याचे आवाहन केले आहे.  तर रेल्वे परिसरातपंतग उडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा