मुंबईतील वर्दळीचं स्थानक असलेलं वांद्रे रेल्वे स्टेशन बाॅम्बस्फोट घडवून उडवण्याची धमकी देणारा फोन रविवारी खार पोलिसांना आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाला अलर्ट करत वांद्रे स्थानकावर शोधमोहीम राबवली. २ तासाच्या तपासणीनंतर पोलिसांनी स्थानक परिसरात कोणतिही संशयास्पद गोष्ट आढळून आली नसली तरी स्थानक परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आधीच वातावरण तापलं असताना. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्वाची स्थानके, परिसरात सुरक्षा यंत्रणांना गस्त वाढवण्यास सांगितलं आहे. त्यातच रविवारी खार पोलिस ठाण्यात एक निनावी फोन आला. फोनवरून लवकरच वांद्रे स्थानक स्फोटकांनी उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली.
या फोननंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मात्र स्थानक परिसरात संशयास्पद काहीही आढळून आलं नाही. पोलिसांनी या फोनचा माग काढला असता. हा फोन अमेरिकेतून आल्याचं निष्पन्न झालं. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा-
लग्नास नकार दिल्याने महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक
नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे अटकेत