वर्क व्हिसासाठी 25 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी जोडप्यावर गुन्हा दाखल

वर्क व्हिसा देण्याच्या बहाण्याने 25 जणांची 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी रीना आणि गौरव शाह या जोडप्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वर्क व्हिसासाठी 25 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी जोडप्यावर गुन्हा दाखल
SHARES

वर्क व्हिसा (visa) देण्याच्या बहाण्याने 25 जणांची 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी रीना आणि गौरव शाह या जोडप्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशाच एका प्रकरणात, पोलिसांनी एसीएल ट्रॅव्हलचा मालक दिव्येश पटेलवरही गुन्हा दाखल केला आहे, ज्याने व्हिसा देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाकडून 79 लाख रुपये घेतले.

पटेल यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. पहिल्या प्रकरणात शाह दाम्पत्य मालाडचे (malad) कार्यालय बंद करून फरार झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रारकर्त्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून, दोन संशयितांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार सारिका धर्माधिकारी (46) या मालाडमधील (malad) मालवणी (malvani) येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत ते कर्मचारी आहेत.

कामानिमित्त कॅनडाला (canada) जाण्याच्या इच्छेने तक्रारदार सारिका धर्माधिकारी (46) शाह जोडप्याच्या संपर्कात आले, त्यांना कळले की ते काचपाडा येथे व्हिसा संदर्भात कार्यालय चालवतात. त्यांना भेटल्यानंतर सारिका धर्माधिकारी यांनी त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात 7.16 लाख रुपये जमा केले. तथापि, या शाह दाम्पत्य ठराविक कालावधीत व्हिसा तयार करुन देण्यात अपयशी ठरले आणि धर्माधिकारी यांचे पैसे देखील परत नाही करू शकले.

या जोडप्याने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर धर्माधिकारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. व्हिसा कंपनी चालवणाऱ्या बेंगळुरू (banglore) येथील रहिवासी सुनयना पेरूरी यांची देखील फसवणूक केल्याचा गुन्हा पटेल यांच्याविरुद्ध आहे. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, पटेलने व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती. 



हेही वाचा

दिशा सालियन हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना नोटीस

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरणाचे काम सुरू : उदय सामंत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा