'स्टार इंडिया' व 'प्रोजेक्ट मुंबई' कडून पोलिसांना 10 हजार पीपीई किट


'स्टार इंडिया' व 'प्रोजेक्ट मुंबई' कडून पोलिसांना 10 हजार पीपीई किट
SHARES
कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे, यासाठी स्टार इंडिया,डिस्ने व हाँटस्टार चे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिशिर जोशी यांनी पोलिसांना 10  हजार खाकी रंगाचे  पीपीई कीट भेट दिले.


मुंबईत कोरोना या संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पोलिस हे 24 तास झटत आहेत. अशातच राज्यातील 1007 पोलिसांना ही या संसर्गजन्य रोगाची लागन झाल्याचे पुढे आले. तर आतापर्यंत सात पोलिसांचा या रोगाने जीव घेतला आहे. नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांचे या महामारीपासून रक्षण करण्यासाठी स्टार इंडिया,डिस्ने व हाँटस्टारने पुढाकार घेत पोलिसांना 10 हजार पीपीई किट देण्याचे ठरवले होते. 


या पूर्वी मुंबई पोलिसांना गोदरेज समूहाकडून पोलिसांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 25 लाखांचे डोनेशन दिले होते. या सारख्या अनेक कंपन्या पोलिसांच्या रक्षणासाठी मदतीस पुढे आल्या आहेत.  सध्या देण्यात आलेले 'पीपीई किट' कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी निश्चितच पोलीस विभागाला महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी भेट असून त्यांनी या भेटी बद्दल स्टार इंडिया व प्रोजेक्ट मुंबईचे गृह विभागाच्या वतीने आभार गृहमंञ्यांनी मानले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा