लाल डोंगर - चेंबूरच्या लाल डोंगर परिसरातील झोपड्यांमध्ये बुधवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये धनंजय लांडगे आणि महादेव लांडगे हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. लालडोंगर परिसरातील डोंगरावर असलेल्या घरामध्ये आग लागल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठया अडचणींना समोर जावं लागलं. मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.