कुर्ला येथून २६ लाखांच्या गांजासह पाच तस्करांना अटक


कुर्ला येथून २६ लाखांच्या गांजासह पाच तस्करांना अटक
SHARES

आंध्र प्रदेश येथून मुंबईत विक्री साठी आणलेल्या २६ लाख रुपये किमतीचा १३० किलो गांजा व १३ लाखांची कार अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (एएनसी) वरळी युनिटने जप्त केली आहे. या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

राजेश सुखराराज जैस्वाल  (४२), दुर्गाप्रसाद स्वामी येड्डू (२४), मोहम्मद सुफीयान हनिफ खान (३५), मोहम्मद निसार शेख (३१), निजामुद्दीन अब्दुल लतिफ शेख (३३) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थांची तस्करी शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून सुरक्षा यंत्रणेच्या वेगवेगळ्या विभागाकडून अमली पदार्थांची तस्करी करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे एएनसीच्या वरळी युनिटला मिळालेल्या माहितीच्या आधारे कुर्ला (प.), कमानी ,  फिनिक्स मार्केट सिटी मॉल, एलबीएस मार्ग या ठिकाणी सापळा लावला. या वेळी संशयास्पदरीत्या वावरणा-या पाचजणांना मोटार कारसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडे केलेल्या तपासणीत ६ रेक्झिन बॅगांमध्ये भरलेला १३० किलो गांजा मिळून आला. या गांजाची किंमत २६ लाखांएवढी असल्याचे सांगणयात येत असून जप्त केलेल्या कारची किंमत १३ लाख रुपयांएवढी आहे.  जप्त केलेला गांजा आंध्र प्रदेश येथून विक्रीसाठी मुंबईत आणल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.     

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा