नवी मुंबई : 7 महिन्यांत 195 अल्पवयीन मुली बेपत्ता

शहरातील मुलींच्या बेपत्ता होण्याच्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

नवी मुंबई : 7 महिन्यांत 195 अल्पवयीन मुली बेपत्ता
SHARES

गेल्या सात महिन्यांत 195 अल्पवयीन मुली बेपत्ता (lost) झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच त्यापैकी 172 मुलींचा शोध लागला असला तरी 22 मुली अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये 19 गुन्हे पोक्सो (pocso)अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील मुलींच्या बेपत्ता होण्याच्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या घटना सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई शहरामध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता (girls missing) होण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी 2023 पासून जुलै 2024 पर्यंतच्या दीड वर्षांच्या कालावधीत सुमारे 600 अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांत झाली आहे. यात मुलींची संख्या 400 हून अधिक आहे.

यातील 560 मुला-मुलींचा शोध घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. जानेवारी 2024 ते 12 ऑगस्ट 2024 या साडेसात महिन्यांच्या कालावधीत दाखल झालेल्या अपहरणाच्या एकूण 282 गुन्ह्यांपैकी 248 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील 172 मुली व 76 मुलांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे.

यातील 19 गुन्हे ‘पोक्सो’ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित 34 गुन्ह्यांतील अपहरण झालेल्या मुलामुलींचा शोध घेण्याचे काम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून सुरू आहे. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.

नवी मुंबई (navi mumbai) पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मागील पाच वर्षांमध्ये अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून अपहरण झालेल्या मुलामुलींचा शोध घेतला आहे.

अपहरण झालेल्या, परराज्यांत जाऊन राहणाऱ्या मुलामुलींची कुठलीही माहिती नसताना, शोध घेतला जात आहे. परंतु तरीही 34 गुन्ह्यांतील मुला-मुलींचा शोध लागला नसून त्यामध्ये मुलींची संख्या 22 आहे.

मुलांमध्ये रागाने घर सोडण्याचे प्रमाण अधिक

मागील साडेपाच वर्षांमध्ये सुमारे 500 मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून यातील 470 मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच, स्थानिक पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे.

यातील बहुतांश मुले ही आईवडील अभ्यासावरून रागावल्यामुळे, खेळू न दिल्यामुळे, परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने किंवा इतर काही किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे आढळून आले आहे. तर काही मुले मजा-मस्ती म्हणून घर सोडून गेल्याचे तपासात समोर आले आहे.

झोपडपट्टी भागात अधिक घटना

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या भागात झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्ती आहे. अशा भागात अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे प्रकार समोर आले आहेत.

रबाळे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी व तळोजा या पोलिस ठाण्यांच्या अन्य विभागांच्या तुलनेत मुलामुलींच्या अपहरणाचे प्रकार अधिक आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे. या भागात पोलिसांनी विशेष लक्ष देऊन हे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.



हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बोगद्यासाठी SGNP जवळील झोपड्यांवर हातोडा

पनवेल : केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना 'या' रुग्णालयात मिळणार मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा