लॉकडाऊनच्या काळात (Lockdown) पोलीस बांधव रात्रंदिवस रस्त्यावर राहून जनतेसाठी सेवा देतायत. या कालावधीत कितीतरी पोलिसांना कोरोनाची लागण झाली पण स्वतपेक्षा इतरांची काळजी घेणाऱ्या पोलिसांनी यावरही मात केली. मुंबईतल्या रस्त्यांवर लॉकडाऊन कालावधीत बेवारस असणाऱ्या शिवाय मुलांनी घराबाहेर काढलेल्या कितीतरी वृद्धांसाठी एक खाकीतला माणूस समोर आलाय. विलेपार्ले पोलीस ठाण्यातले राजेंद्र काणे यांनी अश्या अनेकांना आधार देऊन त्यांचं पुनर्वसन केलंय.
हेही वाचाः-खबरदार! बाप्पा झाले पोलिस!
विलेपार्ले पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात पण यावेळी ते रस्त्यावर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी धावून आलेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी जवळपास ६ ते ७ बेवारस आणि घरातून हाकललेल्या वृद्धांना आणि त्यांच्या घरच्यांसोबत चर्चा करून पुन्हा घरी पाठवलंय शिवाय ज्यांना हक्काच घर नाही अश्या जेष्ठांना वृद्धाश्रमात राहण्याची सोय केलीय. यापैकी दोन ज्येष्ठांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर ती उपचार करण्याची जबाबदारीसुद्धा राजेंद्र काणे यांनी उचललीय. या आधीही विविध उपक्रमांच्या माध्यमातून काणे यांनी समाजप्रबोधनाचे काम केलेले आहे. नुकतीच कोरोनाच्या काळात नागरिकांना आवाहन करणाऱ्या त्यांच्या गाण्याची दखल ही खुद्द गृहमंत्र्यांनी घेतली होती.
हेही वाचाः- विमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा
तर गणेशोत्सवाच्या काळात खाकी वर्दीतल्या गणपती बाप्पांची ते स्थापना करता. पोलिस आणि जनतेतील दरी दूर करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला होता. गणेशोत्सवानिमित्त अंमली पदार्थ, सायबर गुन्हे तसेच ट्रॅफिकच्या समस्यांवर काही चित्रफिती बनवल्या असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या एलईडी स्क्रीन लावून ते नागरिकांमध्ये जनजागृती करत असतात. सध्या वयोवृद्ध नागरिकांबाबत त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईत इतर वेळी नागरिकांच्या गर्दीत या बेघर ज्येष्ठ नागरिकांवर कुणाची नजर पडत नाही. मात्र कोरोना संक्रमणात मुंबईतल्या रस्त्यांवर ते ठळकपणे वावरताना मला आढळून आले. त्याची परिस्थिती ही डोळ्यांना न पहावल्याने अशाल वृद्धांसाठी काही तरी करण्याचे ठरवले. मग त्याचे पूर्नवसन हाच मार्ग योग्य वाटला. या सर्व व्यवस्थापनात मला पार्लेकर पोलिस मित्रांची मोठी मदत झाली.
राजेंद्र काणे,
पोलिस निरीक्षक, विलेपार्ले पोलिस ठाणे