'फटका गँग'ला जीआरपीचा 'दणका'

अजित भरत झाडे उर्फ खंड्या आणि दिपक शंकर ठोकळ उर्फ मोठा तिर्री या दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून २० मोबाइल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणी आरोपींकडून चोरीचे २ मोबाइल फोन विकत घेणाऱ्या संजय मोरे आणि गौतम सोनावणे या व्यक्तींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

'फटका गँग'ला जीआरपीचा 'दणका'
SHARES

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या हातातील मोबाइल फोन फटका मारून चोरणाऱ्या 'फटका गँग'च्या २ चोरांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.

२० मोबाइल जप्त

अजित भरत झाडे उर्फ खंड्या आणि दिपक शंकर ठोकळ उर्फ मोठा तिर्री या दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून २० मोबाइल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणी आरोपींकडून चोरीचे २ मोबाइल फोन विकत घेणाऱ्या संजय मोरे आणि गौतम सोनावणे या व्यक्तींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

व्यसनासाठी चोरी

व्यसनासाठी हे आरोपी चोऱ्या करत असल्याची माहिती जीआरपीने दिली. या दोघांना यापूर्वी देखील अटक झाली असून सध्या दोघेही जामिनावर बाहेर आले होते.

'असे' चोरायचे मोबाइल

हे दोन्ही आरोपी गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वालधुनी ब्रिजजवळ धावणाऱ्या रेल्वे गाडीच्या दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल फोन हातावर फटका मारून खाली पाडत होते. पोलिसांनी आत्तापर्यंत १ लाख ९६ हजार रुपयांचे चोरलेले मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

हेही वाचा-

पारसिक बोगद्याजवळ महिलांच्या डब्यावर दगडफेक, दोघी जखमी

हार्बर लाईन होणार सुसाट; १०५ किमी/तास वेगाने धावणार!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा