क्रिकेटपटू युवराज सिंह याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री किम शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. किमविरोधात मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी खार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किमने तिची मोलकरीण एस्थर खेस हिचा पगार रोखण्यासोबतच तिला मारहाण केली. हा प्रकार साधारणत: महिन्याभरापूर्वीचा आहे.
किमची मोलकरीण कपडे धूत असताना काळ्या रंगाच्या कपड्यांचा रंग पांढऱ्या रंगाच्या कपड्याला लागल्याने किम नाराज झाली. यावरून किमने मोलकरणीला बरंच काही सुनावलं आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं. एवढ्यावरच न थांबता तिने मोलकरणीला नोकरीवरून काढून टाकत तिचा पगारदेखील रखडवला.
वारंवार पगाराची मागणी करूनही किम पैसे देत नसल्याने अखेर मोलकरणीने खार पोलिसांत जात २७ जून रोजी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावर मोलकरणीने ७० हजार रुपयांचे कपडे खराब केल्याने तिला नोकरीवरून काढल्याची प्रतिक्रिया किमने दिली. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
हेही वाचा-
भारताकडं सोपवण्याचं वृत्त निराधार - झाकीर नाईक
नीरव मोदीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस