उद्धव ठाकरे सरकार न्याय देईल म्हणूनच मुंबईत आत्महत्या

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव असल्याचा आरोप काँग्रेसनं वेळोवेळी केला होता. त्यावरुन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होत होती.

उद्धव ठाकरे सरकार न्याय देईल म्हणूनच मुंबईत आत्महत्या
SHARES

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. या आत्महत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. एसआयटीची घोषणा करताना गृहमंत्र्यांनी मोहन बेलकर यांची सुसाईड नोट वाचून दाखविली. 

आत्महत्या केलेले खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्येसुद्धा दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण दादरा नगर हवेलीत आत्महत्या केली तर आपल्याला न्याय मिळणार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे आणि ते आपल्याला न्याय देईल म्हणूनच आपण मुंबईत आत्महत्या करत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. 

त्यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव डेलकर यांची तक्रारही सभागृहात अनिल देशमुख यांनी वाचून दाखविली. या तक्रारीमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांनीच छळवणूक केल्यामुळे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप पत्नी व मुलाने केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा