लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हाडाचे उप समाज विकास अधिकारी संजय पाटील (54) यांना 50 हजारांची लाच घेताना अटक केली आहे. असं सांगितलं जातंय की, एका महिलेला म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलं होत. पण त्या कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलं.
संजय पाटील यांनी या महिलेला संलग्नकडे (अपिलेट ऑथोरिटी) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सल्ला दिला. संलग्नाकडून महिलेचा अर्ज मंजूर करून तिला घर मिळवून देण्याच्या बदल्यात 50 हजारांची लाच मागितली. लाच देण्याच्या मनस्थिती नसलेल्या महिलेने थेट एसीबीमध्ये याची तक्रार केली. त्यानंतर बुधवारी सापळा रचून 50 हजारांची लाच स्वीकारताना म्हाडाचे उप समाज विकास अधिकारी संजय पाटील यांना रंगेहात अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल.