मुंबईतील जोगेश्वरी परिसरात पाच नराधमांनी मिळून एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला दादर परिसरात आणून सोडले असल्याची माहिती आहे.
आरोपी हे एसी मेकॅनिक असल्याचे कळतंय. लैगिंक अत्याचारानंतर मुलीला दादर परिसरात आरोपींनी सोडले. मुलीला एकटे पाहून आरोपींनी तिला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. दादर परिसरात मुलगी फिरत असताना पोलिसांचे तिच्यावर लक्ष गेले आणि पोलिसांनी तिची चाैकशी केली असता तिने घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला.
त्यानंतर आरोपीची शोधाशोध सुरू झाली. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून या पाच जणांकडून अधिकची माहिती ही घेतली जातंय. या आरोपी आणि मुलीची ओळख अगोदरच होती का? याबद्दलही पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.
हेही वाचा