गँगस्टर रवी पुजारीला मुंबईत आणणार

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला लवकरच चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येणार आहे. सध्या रवी पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे.

गँगस्टर रवी पुजारीला मुंबईत आणणार
SHARES

हत्या, खंडणी आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींना धमकावण्यासोबत इ. गंभीर आरोपाखाली अटकेत असलेला कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला लवकरच चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येणार आहे. सध्या रवी पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

रवी पुजारीचं साधारणत: दीड वर्षांपूर्वी भारतात प्रत्यार्पण  करण्यात आलं होतं. मुंबईत दाखल विविध गुन्ह्यांच्या चौकशीसाठी रवी पुजारीचा ताबा मिळावा यासाठी मुंबई पोलीस सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर शुक्रवारी बंगळुरू मधील स्थानिक न्यायालयाने १० दिवसांच्या कोठडीला मंजुरी दिल्याने रवी पुजारीला अखेर बंगळुरूतून मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत आणल्यानंतर २०१५ मधील एका हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी खंडणी विरोधी पथकाला त्याचा ताबा मिळणार आहे.

हेही वाचा- कमला मिलचे मालक आगीप्रकरणी दोषमुक्त, सरकारची भूमिका काय?

मुंबईमध्ये रवी पुजारीविरोधात ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी २६ गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. बाॅलिवूडमधील सेलिब्रिटींना धमकावण्यात रवी पुजारीचा हातखंडा होता.  २०१७-१८ मध्ये अनेक सेलिब्रिटींनी रवी पुजारीकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. २००९ ते २०१३ दरम्यान रवी पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे रवी पुजारीचा ताबा लवकरात लवकर मिळवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. 

त्याचसोबत रवी पुजारीचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध आलेला असल्याने मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्याच्याकडून मिळू शकेल, असा मुंबई पोलिसांचा कयास आहे. 

मुंबईशिवाय रवी पुजारीविरोधात बंगळुरूत ३९, मंगळुरूत ३६, उडीपीत ११, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा इथं प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. सोबत  गुजरातमध्येही त्याच्याविरोधात सुमारे ७५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुजरातने त्याचा आधी ताबा घेतल्यास मुंबई पोलिसांना आणखी वाट पाहावी लागेल.

(mumbai police will get custody of gangster ravi pujari)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा