हॅलो मी बँकेतून बोलतोय ! फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला दिल्लीतून अटक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिटकार्डची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या केडीटकार्डमधून ७१०५० रुपयांची खरेदी केली होती.

हॅलो मी बँकेतून बोलतोय ! फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला दिल्लीतून अटक
SHARES

मुंबईत सध्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात माटुंगा पोलिसांनी दिल्लीतून एका म्होरक्याला अटक केली आहे. हिमांशु जगदीश लुथरा(३१) असे अटक आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील रोहिणी परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- हा तर मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट- संजय राऊत

दादर पूर्व येथील नायगाव परिसरा राहणारे आनंद जाधव यांना आरोपीने १४ एप्रिलला बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिटकार्डची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या केडीटकार्डमधून ७१०५० रुपयांची खरेदी केली होती. याप्रकरणी जाधव यांनी स्थानिक माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार माटुंगा पोलिसानी याप्रकरणी भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम ६६(क), (ड)अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीचा मोबाईल व बँक खात्याच्या सहाय्याने आरोपी दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने दिल्लीत शोध मोहिम राबवून अखेर आरोपीला अटक केली. आरोपीने तक्रारदार जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील नागरीकांसह देशातील अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी माटुंगा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचाः- राष्ट्रवादीचा धाडसी निर्णय! सुरू केलं 'एलजीबीटी’ सेल

हिमांशु जगदीश लुथरा हा दिल्लीतील रोहिणी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डवर बोनस पाईंट देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील अनेकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस अधिक तपास करत आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा