भांडूपवरून मरिन ड्राइव्ह येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात असलेल्या मित्रांच्या स्कॉर्पियो गाडीचा शनिवारी मद्यरात्री माटुंगा उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. यामध्ये 9 जण जखमी झाले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
भांडुपमध्ये राहणारे पराग शिर्के, अजय जाधव, केतन रासेम, विजय जाधव, प्रथमेश कदम, रितिक कामेकर, मंगेश सावंत, सिद्धेश कदम, मेघन पारेख, हर्षद जाधव आणि अविनाश सावंत हे सर्व स्कॉर्पियो गाडीने जात होते. ही स्कॉर्पिओ समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळल्याने टेम्पोचा चालक मुजनिक नासिर मोहम्मद खान हा देखील गंभीर जखमी झाला आहे. वाढदिवसाच्या पार्टीच्या जोशात स्कॉर्पिओ चालवणाऱ्या अविनाश सावंत याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली आणि दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात स्कॉर्पियो गाडीचे प्रचंड नुकसान झालं आहे. माटुंगा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेत जखमींना सायन रुग्णालयात दाखल केलं. या प्रकारणी माटुंगा पोलिसांनी स्कॉर्पियो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.