दहिसरमध्ये दोन तासात 7 घरांवर दरोडा!


दहिसरमध्ये दोन तासात 7 घरांवर दरोडा!
SHARES

एक किंवा दोन नाही तर, चोरट्यांनी दोन तासात तब्बल 7 घरांमध्ये दरोडा टाकल्याचा प्रकार दहिसर पूर्व मध्ये समोर आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल इथल्या एसआरएच्या एकाच इमारतीतील सात घरांचे कुलूप फोडून चोरट्यांनी दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली. याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसरच्या सरदार वल्लभभाई शाळेजवळ एसआरएची 22 मजली इमारत आहे. चोरट्यांनी 7 जुलै रोजी संध्याकाळच्या वेळी तेथील जनकल्याण इमारत क्रमांक दोनच्या ए विंगमधील सात घरांवर दरोडा टाकला.



कशी झाली चोरी?

फ्लॅट क्रमांक 1006 मध्ये राहणाऱ्या सिद्धार्थ यांच्या घरातील दोन मंगळसूत्र, 3 सोन्याची साखळी, एक सोन्याचा नेकलेस आणि एक अंगठी चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.
फ्लॅट क्रमांक 1009 मध्ये राहणारे कुटुंब गावी गेलेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. सध्या पोलिस कुटुंबातील व्यक्ती परतण्याची वाट पाहत आहेत.
फ्लॅट क्रमांक 710 मधील रहिवासी माया कुंभार यांच्या घरातील 4 तोळे सोने चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.


त्याच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 201 आणि 206 मध्ये देखील चोरी झाली. तर फ्लॅट क्रमांक 110 मधील भारत सावंत यांच्या घरातल्या सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याच इमारतीच्या समोर असलेल्या बी-3 या इमारतीतल्या फ्लॅट क्रमांक 22 मध्ये चोरी झाली.


प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घनास्थळी धाव घेत तपासणी केली. सर्वांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. चोरी करणारे त्याच विभागातले आहेत. यामध्ये अनेकांचा समावेश असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.


- सुभाष सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दहिसर पोलिस ठाणे

 


हे देखील वाचा - 

नालासोपाऱ्यात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

लाखोंच्या मुद्देमालासह दुचाकी पळवली



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा