देवनार - जीवे मारण्याची धमकी देत एका सावत्र बापाने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने बालत्कार केल्याची धक्कादायक घटना गोवंडीतून समोर आली आहे. राजेश सावंत असे आरोपीचे नाव असून तो देवनारच्या गायकवाड नगरमधील रहिवासी आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने पीडित मुुलीच्या आईसोबत विवाह केला होता. दरम्यान घरात कुणीही नसताना हा आरोपी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत होता. मुलीने आईला ही बाब सांगितल्यानंतर शनिवारी महिलेने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.