TRP scam: रिपब्लिकने केलेला ‘तो’ दावा चुकीचा

मुंबई पोलिसांनी त्या शो मध्ये माहिती देणाऱ्या टिव्ही अँकर निरंजन नारायण स्वामी याला चौकशीसाठी समन्स केले आहे.

TRP scam: रिपब्लिकने केलेला ‘तो’ दावा चुकीचा
SHARES

खोट्या टिआरपी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. हा सर्व घोटाळा पोलिसांनी उजेडात आणला असताना. दुसरीकडे रिपब्लिककडून मात्र हंसा कंपनीच्या एका कागदपत्राच्या आधारे पोलिस चुकीची कारवाई करत असल्याचा दावा १० आँक्टोंबरच्या एका शो मध्ये केला होता. मात्र हा दावा आणि हंसा कंपनीचा दावा करण्यात आलेला कागद खोटा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्या शो मध्ये माहिती देणाऱ्या टिव्ही अँकर निरंजन नारायण स्वामी याला चौकशीसाठी समन्स केले आहे.  

हेही वाचाः- NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

टिआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिककडून वारंवार पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. याच दरम्यान रिपब्लिकने १० आँक्टोंबर रोडी एका शो मध्ये हंसाचा रिपोर्ट असल्याचे सांगत, त्या रिपोर्टमध्ये कुठेही रिपब्लिकचे नाव नसल्याचे सांगितले जात होते. तसेच तो रिपोर्ट हा मुंबई पोलिसांच्या तपासातील महत्वाचा दस्तावेज असून तो लिक झाला असल्याचा दावा केला गेला होता. चॅनेलवर अँकर निरंजन नारायण स्वामी ही माहीत देत होता. मात्र या रिपोर्टवर कोणतीही तारीख अथवा कुणाचे नाव नव्हते. तसेच या रिपोर्टबाबत तक्रारदार आणि हंसा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर नितीन देवकर यांच्याकडे चौकशी केली असता. मात्र पोलिस तपासात या रिपोर्टमध्ये तथ्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून याच संदर्भात निरंजन स्वामी याला चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः- MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली

तर या घोटाळ्यात नुसत्या तीन चॅनेलचा समावेश नसून अन्य काही चॅनेलची नावेही समोर आली आहेत. विशाल भंडारीकडून जप्त केलेल्या डायरीतून देखील हीबाब पुढे आल्याचे पोलिस सांगतात. या डायरीत शेकडो नागरिकांना विविध चॅनेल पाहण्यासाठी पैसे दिल्याचे आणि पैशांचा व्यवहाराबाबत माहिती लिहून ठेवल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ३६ जणांचे जबाब नोंदवले असून उद्या रिपब्लिक चँनेलच्या अधिकाऱ्यांसह या संशयित चँनेलला जाहिराती पुरवणाऱ्या अँड एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सीआयूने चौकशीला बोलावले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा