मुंबईच्या गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांनी हत्या, चोरी, लूूूट या सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या दोघांचा ताबा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनोबा भावे नगर पोलिसांना दिला आहे.
मूऴचा उत्तरप्रदेशच्या जोनपूरचा रहिवाशी असलेला रमाशंकर कमलप्रसाद यादव हा २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिल्यांदाच मुंबईला आला होता. मुंबईत त्याचे दोन भाऊ कुर्लाच्या गौरीशंकरमध्ये राहतात. यातील लहान भावाला पोटाचा आजार असल्याने त्याला पाहण्यासाठी रमाशंकरची आई मुंबईला डिसेंबर २०१८ मध्ये आली होती. मात्र तिलाही टायफाॅइड झाल्यामुळे ती मुंबईतच उपचार घेत होती. या दोघांना पुन्हा मूळ गावी जोनपूरला नेण्यासाठी रमाशंकर पहिल्यांदाच मुंबईला आला होता.
उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असल्याने १८ मार्च रोजी पहाटेच तात्काळ सीट बुकींग करण्यासाठी रमाशंकर कुर्ला टर्मिनलला जात होता. तेथून तो त्याच्या जोगेश्वरीच्या चुलत्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याने त्याने मिठाई घेतली होती. चेंबूर लिंक रोडवर अल्पवयीन आरोपी आणि मोहम्मद सादिक मोहम्मद अली शेख या दोघांनी त्याची वाट अडवली. दोघांनी त्याला पुढे हत्या झाली असल्याचं सांगून पुढं जाण्यापासून रोखलं. मात्र, त्यांच्याकडं दुर्लक्ष करत रमाशंकर पुढे चालत राहिला.
त्यानंतर दोघांनी रमाशंकरच्या हातातील बँगेत पैसे असतील म्हणून त्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र रमाशंकरने त्यांना विरोध केला. त्यावेळी तिघांमध्ये हाणामार ही झाली. त्यावेळी सादीकने रमाशंकरवर चाकूने हल्ला करत पळ काढला. यात रमाशंकरचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी वि.बी.नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.
गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग केला. या हत्या प्रकरणात पोलिसांजवळ कोणताही पुरावा नव्हता. सीसीटिव्हीतही हे दोघे आढळून आले नव्हते. मात्र, या हत्येत या दोघांचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यनुसार सहपोलिस आयुक्त नेताजी भोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक खोत, योगेश चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने या दोघांना शुक्रवारी शिवाजी नगर येथील राहत्या घरातून सकाळी अटक केली. यातील अल्पवयीन आरोपींवर तीन तर सादीकवर दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
तपासात हे दोघेही पैशांसाठी हे कृत्य करायचे हे उघडकीस आलं. दोघे ह आठवड्यातून तीन वेळा पहाटेच दारू पिवून बाहेर पडायचे. रमाशंकरची हत्या करण्यापूर्वी हे दोघे सायन, माहिम, चेंबूरनाका फिरून आले होते. त्यांनी बीकेसीत एकाला लुटून चेंबूर लिंकवर रमाशंकरला लक्ष्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतरही दोघांची ही कृत्ये सुरूच होती.
चोरी करण्यासाठी अनेकदा हे मित्रांची दुचाकी खोटे सांगून न्यायचे. मात्र दुचाकी नसली की रस्त्यावर उभी असलेली कोणतीही दुचाकी वायर सोडवून सुरू करायचे. चोरी करून झाल्यानंतर ती दुचाकी पुन्हा आहे त्या ठिकाणी सोडायचे. शिवाजी नगर पोलिस एका गंभीर गुन्ह्या त्यांना शोधत होतेे. या दोघांंवरही पोलिसांनी ३०२,३४ भा.द.वि कलमांतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवूूून त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा -
अनैतिक संबंधातून बापाकडून ५ वर्षाच्या मुलाची हत्या
आजारपणाला कंटाळून सायनमध्ये दाम्पत्याची आत्महत्या