कफ परेड - मेकर टॉवरच्या 20व्या मजल्यावर लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 11 जणांना सुरक्षित इमारतीबाहेर काढण्यात आलं आहे. कफ परेडमध्ये मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दालाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीची घटना घडली तो फ्लॅट बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांच्या नावे असल्याची माहिती आहे. शेखर बजाज यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यात यश आलं असून सर्व्हंट रुममध्ये असलेल्या दोन पुरुषांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.