जादूटोणा केल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून वाकोला इथं एका ५६ वर्षांच्या व्यक्तीची शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अजीम अमिदशाह खान, जाहिद उमरशाद खान, गुड्डू युसूफ शेख आणि जितेंद्र जीवन यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वाकोला परिसरात राहणारे अब्दुल्ला खान (५६) शुक्रवारी डिसेंबर रोजी सांताक्रूझ (पू.), कलिना, बिल्सिल्ला मिल्क सेंटर समोरून जात होते. त्यावेळी चार आरोपींना त्यांना धारदार शस्त्रे, सळई व दांडक्याने मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी वाकोला पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आरोपींचा शोध घेत असताना आरोपी टॅक्सीतून फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाकोला जंक्शन इथं पाळत ठेवली असता एक टॅक्सी पोलिसांच्या नजरेस पडली. त्यात चार संशयीत इसम दिसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता अब्दुल्ला खान याच्या हत्येची त्यांनी कबुली दिली. अमिदशान खान याचा मुलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तो अब्दुल्ला याने केलेल्या जादूटोण्यामुळे झाल्याचा संशय त्याला होता. त्यातूनच त्याने इतर साथीदारांच्या मदतीने त्याची हत्या केल्याचा उलगडा झाला आहे.
हेही वाचा-
भाडेकरू मुलीचं केलं अश्लील चित्रीकरण, गिरगावमधील घरमालकाला अटक
मूल होत नसल्याने मुलीचे अपहरण, २ महिलांना अटक