वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार

मुंबई पुन्हा एकदा बलात्काराने हादरली आहे.

वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार
SHARES

वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हरिद्वारहून 55 वर्षीय महिला तिच्या नातेवाइकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले होते. त्यावेळी ती प्लॅटफॉर्म थोडा वेळ झोपली होती. मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली.

त्यावेळी त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले. थोड्या वेळाने तो हमाल आत ट्रेनमध्ये शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हमाल तिथून पळून गेला. महीलेच नातेवाईक आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली.

बलात्काराची घटना घडल्यानंतर महिलेच्या नातेवाईकाने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे हमालाचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. 

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलीस कर्मचारी असतात. परंतु या प्लॅटफॉर्मवर कोणीच सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते यावर अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, प्लॅटफॉर्मच्या प्रभारींवर काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

या घटनेने मुंबई शहर पुन्हा एकदा हादरले आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याआधीही मुंबई लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळं महिला मुंबईत किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 



हेही वाचा

29 वर्षांनंतर दाऊदच्या साथीदाराला अटक

विक्रोळी रेल्वे स्थानकात जोडप्याची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा