Advertisement

वाचकांसाठी पुस्तकांची मेजवानी


वाचकांसाठी पुस्तकांची मेजवानी
SHARES

दादर - दादरच्या साहित्य अकादमी सभागृहात राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त पुस्तकाचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मंगळवार 15 नोव्हेंबर ते रविवार 20 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पुस्तकांची विक्री होणार आहे. 24 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकांच्या सर्व आवृत्त्यांवर 20 ते 50 टक्के सूट असेल. त्यामुळे वाचनप्रेमींना आपल्या आवडत्या पुस्तकांची खरेदी या प्रदर्शनात करता येईल. "गेली 8 वर्षे साहित्य अकादमी पुस्तकांचं हे प्रदर्शन भरवते आहे. तसंच या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो, असं साहित्य अकादमीच्या ग्रंथपाल रागिणी चुनेकर यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा