Advertisement

आयसीएसई बोर्ड परीक्षेसाठी कोरोना लस सक्ती नाही, विद्यार्थ्यांना दिलासा

यापूर्वी बोर्डानं विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्रोत्साहन देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

आयसीएसई बोर्ड परीक्षेसाठी कोरोना लस सक्ती नाही, विद्यार्थ्यांना दिलासा
(Representational Image)
SHARES

आयसीएसई बोर्डाच्या दुसऱ्या सत्राच्या दहावी-बारावीच्या परीक्षा २५ आणि २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची कोणतीही सक्ती नसेल, असं बोर्डाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी बोर्डानं विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्रोत्साहन देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे आता लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं ४ जानेवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं अशा सूचना शाळांना दिल्या होत्या.

मात्र आता परीक्षेला काही दिवसच शिल्लक असताना बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी कोरोना लसीकरण अनिर्वाय नसल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं आहे. बोर्डाच्या वतीनं सर्व शाळांना कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी CISCE आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बोर्डानं दिलेला हा आदेश समोर आला आहे. यानंतर, CISCE ने एक परिपत्रक जारी केलं ज्यामध्ये आपल्या पूर्वीच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ कसा लावला गेला हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवीन परिपत्रकात, CISCE कसे पुष्टी केली आहे की, पूर्वीचे परिपत्रक केवळ संलग्न शाळांसाठी एक सल्ला होता. ICSE आणि ISC या वर्षी अनुक्रमे १०वी आणि १२ वीच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ते अनिवार्य किंवा पूर्व अट नाही.

गायकवाड यांनी ट्विटरवर CISCE परिपत्रकाची प्रत शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, “मी CISCE चे त्वरित स्पष्टीकरण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चिंता दूर होतील अशी आशा आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देते.”

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये उपस्थित राहण्यासाठी लस प्रमाणपत्रे अनिवार्य नाहीत, ज्याचा उल्लेख उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मात्र, शाळांसाठी असं कोणतंही स्पष्टीकरण जारी करण्यात आलेलं नाही.



हेही वाचा

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलासा! ऑफलाईन परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरीक्त वेळ

लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज, विद्यापिठात जाण्याची परवानगी : उदय सामंत

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा