२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय (Colleges) सुरू आहेत. या दृष्टीनं नुकत्याच गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या. पण ज्यांनी लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांचं (Student) काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. या संदर्भात देखील एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
शहरातील महाविद्यालये विद्यार्थ्यांची एक यादी तयार करत आहेत. या यादीत पूर्णपणे लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
जर विद्यार्थ्यांचे दोन व्हॅक्सिन डोस पूर्ण झाले नसतील, तरी त्यांना कॉलेजला यायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. महाविद्यालयांनी जवळच्या पालिकेच्या वॉर्ड ऑफिसशी संपर्क साधून अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विशेष लसीकरण कार्यक्रम आखणं आवश्यक आहे.
“आम्हाला २० ऑक्टोबर रोजी कॉलेज पुन्हा सुरू होईल असा विश्वास आहे. ज्यांना लसीकरण केले गेले नाही ते ऑनलाइन वर्गात येऊ शकतात. आम्ही त्या विद्यार्थ्यांची यादी देखील तयार करू, ज्यांना लसीकरण केले गेले नाही. मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या SOP मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यासाठी आम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शुल्कावर परिणाम होणार नाही,” असं वांद्रेतील एमएमके कॉलेजचे प्राचार्य सीएम किशोर एस पेशोरी म्हणाले.
विलेपार्ले इथळ्या साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा चेहरा पाहिला नाही त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. आम्ही २० ऑक्टोबरपासून महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहोत.”
मुलुंड (पूर्व) इथळ्या वाजे-केळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य सीए विद्याधर जोशी म्हणाले, “परीक्षा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे थोडा वेळ लागेल. आमचे कॉलेज त्या विभागांसाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकते जिथे प्रतिवर्ग विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.”
या निर्णयामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. "आमच्या कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते लवकरच आमच्याशी संवाद साधतील. मी माझ्या कॉलेजच्या मित्रांना एक वर्षापेक्षा जास्त काळ भेटलो नाही," असं सेंट झेवियर्स कॉलेजचे तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी शर्मेन लोबो म्हणाली.
हेही वाचा