Advertisement

विज्ञान प्रदर्शनात माहिमच्या सरस्वती विद्या मंदिर शाळेची बाजी


विज्ञान प्रदर्शनात माहिमच्या सरस्वती विद्या मंदिर शाळेची बाजी
SHARES

जी-उत्तर आणि जी-दक्षिण येथील सन २०१७-१८च्या विभाग स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात माहिम येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेनं बाजी मारली आहे. आपले जीवन आपली सुरक्षा, भस्मासुराची सप्तपदी आणि आनंदी शिक्षण या विषयांवरल आधारित केलेल्या प्रदर्शनात या शाळेच्या मुलांनी दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे, तर वक्तृत्व स्पर्धेत तसेच सर्वोकृष्ठ विज्ञान मंडळात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे.


विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही मिळवले प्रावीण्य

वरळीतील ‘सॅक्रेड हार्ट हायस्कूल’ शाळेत दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जी-उत्तर आणि जी-दक्षिण अर्थात लोअर परळ ते माहिम, धारावी आदी विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनात माहिमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रावीण्य मिळवले आहे. शाळेतील शिक्षिका पूजा यादव, जामुनाराणी, वैशाली फापाळे , प्रज्ञा पाटील, राजाराम बंडगर, उमेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांनी तसेच शिक्षकांनी विज्ञान प्रदर्शनात आपली चमक दाखवली आहे.


द्वितीय पारितोषिक :

  • विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रकल्प (वरिष्ठ गट) : आपले जीवन आपली सुरक्षा
  • कौस्तुभ उमेश चव्हाण.
  • यश श्रीकांत सुतार.
  • मार्गदर्शक शिक्षक : वैशाली ई. फापाळे.


द्वितीय पारितोषिक :

  • प्रज्ञा सु. पाटील (शिक्षक प्रकल्प - वरिष्ठ गट) : भस्मासूराची सप्तपदी


द्वितीय पारितोषिक :

  • राजाराम बंडगर (शिक्षक शैक्षणिक साहित्य - वरिष्ठ गट) : आनंदी शिक्षण
  • द्वितीय पारितोषिक : सोनू, तुझा विज्ञानावर भरोसा नाही का ?
  • उमेश परब ( प्रयोगशाळा सहाय्यक प्रकल्प )


प्रथम क्रमांक :

  • ध्वनी आनंद गोडे (वरिष्ठ गट) : वक्तृत्व स्पर्धा


प्रथम क्रमांक :

  • सर्वोत्कृष्ट विज्ञान मंडळ
  • मार्गदर्शक शिक्षक : पूजा यादव, जामुनाराणी, फापाळे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा