बॉलिवूडमध्ये #Metoo या मोहिमेने खळबळ माजली असतानाच, आता शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थिनीही व्यक्त होऊ लागल्या आहेत. मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजांमधील विद्यर्थिनींनी पुढे येऊन आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकाराबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्याने शिक्षण क्षेत्रालाही बुधवारी हादरे बसले आहेत.
गैरप्रकाराला वाचा फोडली
झेविअर्स कॉलेजमधील कृपा फर्नांडिस या माजी विद्यार्थिनीने सन २०१३ मधील घडलेल्या गैरप्रकाराला वाचा फोडली असून संपूर्ण कॉलेज प्रशासनालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं आहे. झेविअर्स कॉलेजच्या फेसबुक पेजवर आणि आपल्या वैयक्तिक फेसबुक पेजवर आलेला अनुभव कथन केला आहे. कॉलेजांतील महिला विकास कक्ष विद्यार्थिनी आणि महिलांची बाजू समजून घेत नसतील तर असं कक्ष नसलेलं बरं, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे.
तिलाच चुकीचं ठरवलं
कृपा ही सध्या नोकरी करत असून जानेवारी २०१५ मध्ये तिने कॉलेजच्या महिला विकास कक्षाकडे आपला प्रियकर आपल्याला मारहाण करत, अपमानकारक वागणूक देत असल्याची तक्रार केली होती. आठवड्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेत तिला महिला विकास कक्षाच्या समितीसमोर उभं करण्यात आलं. मात्र मानसशास्त्राच्या प्राचार्या, इतिहास विषयाचे प्राचार्य, समाजसेवी संस्थेच्या महिला यांचा समावेश असलेल्या समितीने कृपाची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच चुकीचं ठरवलं.
फेसबुकवर केली पोस्ट
'तुझ्यावर कोणत्या प्रकारचे उपचार सुरू आहेत का? तू याआधी किती रिलेशनशिप्समध्ये होतीस? असे प्रश्न तिला विचारण्यात आले. लैंगिक शोषण झाल्याची माहिती तिने सांगितल्यानंतर, ‘तुम्ही रिलेशनशिपमध्ये होतात ना... मग?’ असा उलट सवाल तिला विचारण्यात आला. शेवटी तिच्या प्रियकरावर एका आठवड्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर कृपाच्या त्रासात भर पडून कॉलेजच शेवटचं वर्ष तिला प्रचंड तणावाखाली आणि अपमान सहन करून काढावं लागल्याचं' तिने फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे.
‘येथे विद्यार्थ्यांचा समावेश हवा’
मला झेव्हिअर्सच्या महिला विकास कक्षाची लाज वाटत असून, असे कक्ष काही कामाचे नसल्याची प्रतिक्रिया कृपाने दिली. अशा समित्यांमध्ये खरंतर विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज आहे. आजचे विद्यार्थी स्मार्ट असून, त्यांचे विषय ते स्वत: चांगले हाताळू शकतात. त्यामुळे यात विद्यार्थी समावेशिष्ठ करणे गरजेचं असल्याचंही मत कृपाने व्यक्त केलं आहे. दरम्यान, या विषयासंदर्भात झेविअर्सच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

हेही वाचा -
#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप
#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप