Advertisement

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये यंदा अभिनेता रोबो

यंदाच्या टेकफेस्टमध्ये अभिनय करणारा रोबो पाहायला मिळणार आहे.

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये यंदा अभिनेता रोबो
SHARES

आशियातील सर्वात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा महोत्सव अशी आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टची ओळख आहे. यंदा ३ ते ५ जानेवारी या कालावधीत टेकफेस्ट आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या टेकफेस्टमध्ये अभिनय करणारा रोबो पाहायला मिळणार आहे. हा रोबो अभिनयाबरोबरच नृत्यही करणारा आहे. विशेष म्हणजे हा रोबो नाटकातही काम करणारा असून माणसाचा स्वभावही सांगू शकणार आहे.

रोबो टेस्पीयन

अत्याधुनिक जागात आपण अनेक रोबो पाहिलेत. हे रोबो माणसांप्रमाणेच लिहितात, वाचतात आणि इतर गोष्टी करतात. मात्र, यंदाच्या टेकफेस्टमध्ये जगातील पहिला अभिनय करणारा, बोलणारा आणि नृत्य करणारा रोबो सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. रोबो टेस्पीयन हा माणसांसोबतही संवाद साधू शकतो. त्याचप्रमाणे माणसांप्रमाणे हावभाव करणं, भावना व्यक्त करण्यासह नक्कल करण्याचं कौशल्य या रोबोमध्ये आहे. या रोबोचे डोळे एलसीडी कनव्हे करणारे आहेत.

३३ किलो वजनाचा रोबो

या रोबोला एखादा मजकूर वाचण्यास दिल्यास तो त्या पद्धतीनं वाचून देखील दाखवू शकतो. त्याचप्रमाणे तो तशा पद्धतीचं नृत्यदेखील सादर करू शकतो. त्यामुळॆ आत्तापर्यंतचा सर्वात आधुनिक असा रोबो टेकफेस्टमध्ये सादर करण्यात येणार आहे. गर्दीत उभ्या असलेल्या नागरिकांचा चेहरादेखील ओळखण्याची यंत्रणा या रोबोमध्ये आहे. ५ फूट ९ इंच उंचीचा हा रोबो ३३ किलो वजनाचा आहे. याची बॉडी पूर्ण स्टिलची आहे. त्याचप्रमाणे हा रोबो माणसाचे वय आणि माणसाचा स्वभावदेखील सांगू शकणार आहे. हा रोबो जवळपास ३० भाषा बोलू आणि समजू शकतो, तर ७० आवाजात बोलू शकणार आहे.



हेही वाचा -

रेल्वे पुलांच्या बांधकाम प्रकल्पखर्चात होणार वाढ

आरेप्रकरणी सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणी



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा