यंदा बारावीत नापास झाला असाल आणि याच वर्षी पुढील शिक्षण घेता येणार नाही म्हणून निराश असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता असून फेरपरीक्षेच्या अर्जाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यानंतर या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण याच वर्षी घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी ४ जून ते १३ जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्ज भरता येणार आहे.
फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कॉलेजमार्फत हा अर्ज भरता येणार आहे. तसेच १३ जून नंतर लेट फी भरून १९ जूनपर्यंत हा अर्ज करता येईल, असंही बोर्डाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०१८ आणि फेब्रुवारी-मार्च २०१९ अशा दोन संधी मिळणार आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षांच्या अर्जाकरता ४ ते १३ जून ही तारीख देण्यात आली आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ कॉलेजमार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परीक्षा अर्जाप्रमाणेच हा अर्ज असणार आहे. तसंच १३ जूननंतर लेट फी भरून विद्यार्थ्यांना १९ जूनपर्यंत अर्ज करता येता आहे.
- डॉ. सुभास बोरसे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ