Advertisement

विनाअनुदानित शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन


विनाअनुदानित शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन
SHARES

आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई प्रांत विनाअनुदानित, अनुदानित शाळा कृती समितीने गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानाच्या प्रश्नासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारला आहे. शासन नियमानुसार निधी मंजुरीची घोषणा शासनस्तरावर करण्यात येत नाही, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही विनाअनुदानित शाळा सुरू करायच्या नाहीत, असा निर्धार राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याशिवाय समितीच्या मागण्यांच्या निवेदन देण्यासाठी मंगळवारी २० नोव्हेबरला सर्व शिक्षक मंत्रालयावर धडक देणार आहेत.


अनेक कर्मचारी त्रस्त

अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना आणि शिक्षकांना संपवणाऱ्या शासन निर्णयातील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात. तसंच मराठी शाळांना नवी संजीवनी देण्यात यावी. त्याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार देण्यात येत नसल्यानं अनेक कर्मचारी त्रस्त झाले आहेत. यांसह समितीनं मांडलेल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार शिक्षकांनी केला आहे. त्याशिवाय सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून दहावी आणि स्कॉलरशिपचे जादा तास बंद करण्यात आले आहेत.

आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनात मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर यांसह विविध ठिकानचे शिक्षक यात सहभागी झाले आहेत.

विविध मागण्यांसाठी समितीच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून लढा सुरू असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या समितीला दिलेलं आश्‍वासन न पाळल्यानं शिक्षकांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समितीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असून मंगळवारी मंत्रालयावर धडकणार आहे.
- प्रशांत रेडीज, प्रदेशाध्यक्ष, विनाअनुदानित कृती समिती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा