चर्चगेट - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी भारतीने मुलींच्या ड्रेसकोड संदर्भात तालिबानी फतवे काढणाऱ्या एसएनडीटीच्या कुलगुरूंना गुलाबाचे फूल दिले. एका वेगळ्या प्रकारे तालिबानी विचारसरणी असणाऱ्या कुलगुरूंचा निषेध नोंदवला. आजच्या आधुनिक काळात लोकशाही असताना असे फतवे काढणे हे मानसिक आणि वैचारिक रुग्ण असल्याचे लक्षण आहे, असा आरोप विद्यापीठ अध्यक्षा चिंगारी यांनी केला.
6 डिसेंबर 2016 ला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मुलींच्या ड्रेसकोडसंदर्भात फतवा काढला होता. त्यावेळेस विद्यार्थी भारतीने आंदोलन करून त्या नियमाला जोरदार विरोध केला. त्यावेळेस झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत याबद्दल लेखी प्रतिक्रिया कळवू असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते. मात्र अदयाप त्यांनी एकही पत्र किंवा लेखी, तोंडी प्रतिसाद दिला नाही.