मुंबई- बंगळुरूतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर अभिनेता अक्षय कुमारने त्यावर तीव्र टिप्पणी करणारा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. आता अक्षय कुमारने आणखी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. यावेळी 'प्रजासत्ताक दिनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी पुढाकार घ्या' असं आवाहन अक्षयनं केलं आहे. हा व्हिडिओ अक्षयनं सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे.
अक्षय या व्हिडिओत पुढे म्हणतो की देशाचे जवान त्यांचा बहुतेक वेळ हा देशाच्या संरक्षणासाठी आणि देशवासियांच्या सुरक्षेसाठी देतात. अनेक जवान यासाठी त्यांच्या प्राणांचीही आहुती देतात. पण आपण या जवानांच्या कुटुंबियांसाठी काय करतो? असा सवालही अक्षयनं या व्हिडिओत विचारलाय.
जवानांच्या या कुटुंबियांना सामान्य जनतेशी जोडणारं एखादं मोबाईल अॅप किंवा वेब पोर्टल असायला हवं असंही अक्षय या व्हिडिओत सुचवतो. यातून या जवानांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या लोकांशी संपर्क होणं अधिक सोपं होईल असं अक्षय म्हणतो.
अक्षयने त्याच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे-
https://www.facebook.com/akshaykumarofficial/?hc_ref=NEWSFEED&fref=nf