Advertisement

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचा अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम

अ‍ॅव्हेंजर सिरीजसाठी प्रेक्षक किती क्रेझी आहेत हे काही सांगायला नको. प्रेक्षकांची हीच क्रेझ पाहता १०० पेक्षा अधिक शहरांत दररोज १००० पेक्षा अधिक शो होणार आहेत. भारतात इंग्लिश, हिंदी, तेलगू, तमिळ भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचा अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम
SHARES

 मार्वेल सुपरहिरो फ्रेंचाइजी अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा हॉलिवूडपट  शुक्रवारी रिलीज झाला. पण चिञपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.  हॉलिवूड चित्रपट असला तरी अ‍ॅव्हेंजर्स सिरीजची भारतात चांगलीच क्रेझ आहे. हेच कारण आहे की, भारतात केवळ एका दिवसांत या चित्रपटाच्या तिकिटांची विक्री १०  लाखांच्या वर गेली.  यासोबतच अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमनं अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे सर्व विक्रमच मोडले आहेत.


सेकंदाला १८ तिकिटांचं बुकिंग

बुक माय शो अ‍ॅपनुसार, दर सेकंदाला अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमच्या १८ तिकिटांचे बुकिंग होते. यावरून तुम्हा सर्वांना अंदाज आलाच असेल की अ‍ॅव्हेंजर्स सिरीजची अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर अ‍ॅव्हेंजर्सनं बाहुबली २, टायगर जिंदा है सारख्या चित्रपटांना  देखील मागे टाकले आहे. बाहुबली २ चित्रपटाचे ३१.५०  कोटी रुपयांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले होते. टायगर जिंदा है चित्रपटाचे २५ कोटी रुपयांचे बुकिंग झाले होते.


रोज १ हजार शो

अ‍ॅव्हेंजर सिरीजसाठी प्रेक्षक किती क्रेझी आहेत हे काही सांगायला नको. प्रेक्षकांची हीच क्रेझ पाहता १०० पेक्षा अधिक शहरांत दररोज १०००  पेक्षा अधिक शो होणार आहेत. भारतात इंग्लिश, हिंदी, तेलगू, तमिळ भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपट ३ तास २ मिनिटाचा असून यात मार्वेलच्या २२ चित्रपटांचे सुपरहिरो एकत्र दिसणार आहेत.



हेही वाचा -

कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीर नाही 'हा' कलाकार होता पहिली पसंती

सलमान खानच्या 'तेरे नाम'चा सीक्वेल येणार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा