Advertisement

अभिनेता कुशाल पंजाबी याची आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता कुशाल पंजाबी याचं शुक्रवारी निधन झालं आहे.

अभिनेता कुशाल पंजाबी याची आत्महत्या
SHARES

बॉलीवूड अभिनेता कुशाल पंजाबी यानं आत्महत्या शुक्रवारी आत्महत्या केली आहे. स्पॉटबॉयनं यासंदर्भातील वृत्त प्रसारीत केलं आहे. या वृत्तात म्हटलं आहे की, "त्यानं त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही याविषयी चेतन हंसराज आणि करणवीर बोरा यांच्याशी बातचित केली आणि त्यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय." कुशालच्या आत्महत्याचं कारण अजूनही कळू शकलं नाही.

कुशाल पंजाबी यानं अनेक टिव्ही सीरीयल व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळं अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. कुशल पंजाबी आपल्या अभिनय कौशल्यामुळं ओळखला जात असून 'काल’, 'धन धना धन गोल’, 'लक्ष्य' यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनं केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे.

अभिनेता कुशाल पंजाबी यानं CID, हम तुम, झलक दिखला जा ७, क्या हाल मिस्टर पांचाल, सजन रे फिर झूट मत बोलो, इश्क में मरजावां यासारख्या बऱ्याच टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं आहे. इंडस्ट्रीमधील त्यांच्या काही मित्रांपैकी करणवीर बोहरा यानं सोशल मीडियावर याबाबत पोस्ट टाकली आहे.

अभिनेता प्रमाणेचं कुशाल यानं देशात यशस्वी मॉडेल म्हणून आपली ओळख बनवली आहे. कुशाल यानं अनेक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला आहे. कुशल पंजाबी हा ३७ वर्षाच्या असून त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे.





Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा