Advertisement

लिसाचा ब्रेस्टफीडिंग करतानाचा फोटो व्हायरल!


लिसाचा ब्रेस्टफीडिंग करतानाचा फोटो व्हायरल!
SHARES

मॉडल आणि अभिनेत्री लिसा हेडन नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लाइफस्टाइल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. या वेळी मात्र तिचा एक वेगळा फोटो चर्चेला कारणीभूत ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी लिसाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिच्या मुलाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या वेळी लिसा हेडनने ब्रेस्टफीडिंग वीकनिमित्ताने मुलाला स्तनपान करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोची अनेकांनी प्रशंसा केली आहे. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी शेअर करण्यात आल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी तिच्या फोटोवर सकारात्मक पोस्ट करून तिचे कौतुक केले आहे.



लिसाने फोटोसोबत एक पोस्टही शेअर केली आहे. "मुलाला जन्म दिल्यानंतर तुझे आयुष्य कसे बदलले असा प्रश्न मला अनेकदा विचारण्यात येतो. विशेषत: फिटनेस आणि वजनाबद्दल तर विचारलेच जाते. ब्रेस्टफीडिंग वीक सुरू असल्याने मी हे पाऊल उचलण्याचे ठरवले. बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा पूर्व शरीरयष्टीत परतण्यासाठी स्तनपानामुळे फार मदत झाली. स्तनपान हे खूप आव्हानात्मक आहे. पण आपल्या मुलासाठी ते गरजेचे तर आहेच. शिवाय मुलाच्या अधिक जवळ जाण्यासाठी ही एक उत्तम गोष्ट आहे. स्तनपानाविषयी मी एक ब्लॉग लिहिला आहे तो नक्की वाचा, अशी पोस्ट तिने फोटोसोबत शेअर केली आहे



Weekend vibe????

A post shared by Lisa Haydon (@lisahaydon) on





⭐️???? no greater satisfaction than being your mom my precious. @artipoppe

A post shared by Lisa Haydon (@lisahaydon) on



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा