Advertisement

बॉलिवूडमधल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध हा अभिनेता टाईपरायटर आणि आऊट ऑफ लव्ह या वेबसिरीजमध्ये झळकला होता. सध्या तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा त्यानं इन्स्टाग्रामवर केला.

बॉलिवूडमधल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कुटुंबासमवेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेता पूरब कोहलीनं (Purab Kohli) त्याचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह (coronavirus) असल्याचं कबूल केलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून त्यानं आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली. दोन आठवड्यापूर्वीच कोरोना झाल्याचं त्यांना डॉक्टरांकडून कळालं होतं.

त्यानं इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मित्रांनो, आम्हाला फ्लू झाला होता असं वाटत होतं. जेव्हा आम्ही ही लक्षणं जनरल फिजिशियनला दाखवली तेव्हा त्यांनी आम्हाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं. सुरुवातील अगदी सामान्य फ्लूसारखं वाटत होतं. परंतु त्यात खूप जास्त खोकला झाला होता आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता.”  

त्याच्या जनरल फिजिशियननं त्याला आणि त्याच्या कुटूंबाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं होतं. सुरुवातील त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सामान्य फ्लूसारखीच लक्षणं दिसत होती. परंतु डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असं सांगण्यात आलं.

पूरबनं असंही लिहिलं आहे की, 'पहिल्यांदा त्याची मुलगी इनायाची प्रकृती खालावली होती. दोन दिवस तिला थंडीचा त्रास होत होता. त्यानंतर, पत्नी लकी पायटेनच्या छातीत त्रास जाणवू लागला. पूरबलादेखील कफचा त्रास होत होता. प्रत्येकजण कोरोनाबाबत कफच्या लक्षणांबद्दल बोलत होते. त्यादरम्यान, मला खूप सर्दी झाली. एके दिवशी तर मला खूप त्रास झाला. जवळजवळ तीन दिवस मला या कफमुळे चिडचिड होत होती. या काळात ताप जास्त नव्हता. आमच्या तिघांच्याही शरीराचे तापमान 100 ते 101 फॅरनहाइटपर्यंत होते.'

इंस्टाग्राम पोस्टच्या पूर्वी त्यानं एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की, तब्येत खराब झाली होती मात्र आता सर्वजण बरे आहेत. आयसोलेशनबाबत पूरब म्हणाला की, 'आम्ही दिवसात चार वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या करतो. आलं, हळद आणि मधाचे मिश्रण गळ्यासाठी चांगलं असतं. शिवाय गरम पाण्याची बाटली छातीवर ठेवल्यामुळे छातीतील दुखणं कमी होतं. याशिवाय ध्यान धारणा मानसिक आरोग्य चांगलं ठेवतं. आता २ आठवड्यांनंतंर आमचे शरीर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं जाणवत आहे.'

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला त्यांचा क्वारंटाइनचा काळ बुधवारी संपला. पूरब कोहलीनं रॉक ऑन, रॉक ऑन – २, टाइपरायटर, आवारापन, शादी के साइड इफेक्ट्समध्ये काम केलं आहे. याशिवाय शरारत, सारेगामापा, सिंगिंग सुपरस्टारमध्येही काम केलं आहे. नुकतंच त्यानं एका वेबसिरीजमध्ये देखील काम केलं आहे.



हेही वाचा

कोरोनाविरुद्ध लढ्यात बिग बींचं योगदान, 'अशी' केली मदत

Coronavirus : 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा