मुंबई - पाचशे आणि हजाराच्या नोटेवरील बंदीनंतर मराठी रंगभूमी आता सावरतेय. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या निर्मात्यांपैकी प्रमुख नाव म्हणजे अभिनेते-निर्माते सुनील बर्वे. मराठी नाटक चालण्यासाठी रोख रकमेव्यतिरिक्त इतर सर्व पर्याय आजमावून पाहण्याची कल्पकता बर्वे यांनी दाखवली. त्यामुळेच ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक पुन्हा एकदा तरुणाईनं उचलून धरलंय. पुढील काही दिवसांत चलनतुटवड्याचा गोंधळ कमी होऊन रंगभूमीची गाडी पुन्हा रुळांवर येईल. याबद्दल सुनील बर्वे यांनी ‘चाय चॅट’च्या दुसऱ्या भागात त्यांची भूमिका अधिक स्पष्ट केली.