Advertisement

पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार

पं. संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे, तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावलं आहे.

पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार
SHARES

गानसरस्वती कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा गानसरस्वती पुरस्कार मेवाती घराण्याचे गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरु केला आहे.


२०१७ मध्ये सुरू

भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात यश मिळवलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या कलाकारास हा गानसरस्वती पुरस्कार दिला जातो. १ लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. २०१७ मध्ये पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला होता.


आंतरराष्ट्रीय पातळीवर गायन

पं. संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे, तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावलं आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी ‘जसरंगी’ नामक जुगलबंदीचा अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला आहे.


किशोरीताईंचा आशीर्वादच 

पुरस्कार घोषित झाल्याबाबत अभ्यंकर म्हणाले की,  हा पुरस्कार मिळाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. या पुरस्कारच्या रूपाने किशोरीताईंचा आशीर्वादच मिळाल्याचं मी समजतो. मुंबईतील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात अभ्यंकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Exclusive : कॅामन मॅन रिअॅक्ट झाला तरच अॅथॅारिटीचे डोळे उघडतील : महेश मांजरेकर

‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचा हिंदी रिमेक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा